या संस्थेमार्फत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक खेळ, वैद्यकीय संस्कृती, लहान मुले, युवक व महिला यांच्या विकासासाठी खालील सेवाभावी उद्दिष्टे राबविण्यात येणार आहेत.
एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. परिस्थिती जेमतेम, कुटूब चालवणेही अवघड, त्यात आमच्या शिक्षणाचा भार. गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. पुढे कामासाठी म्हणून मुंबईत आलो. त्याकाळी उपजिवीका भागवणेही कठीण झाले होते. कसेतरी दिवस कहीला लावायचा. पण समाजात वावरत असताना एक प्रश्न नेहमी मला सतावत होता की आपण समाजाचे देणे लागतो. पण परिस्थिती ही अशी आणि कुठलीही गोष्ट एकट्याने शक्य होत नाही. दिवसा मागून दिवस जात होते.
एक दिवस मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी लगेच होकार दिला. ते ही म्हणाले आमची पण खूप इच्छा होती पण हे काम एकट्याचे नाही आणि आम्ही कामाला लागलो. कामाला लागलो पण सुरुवात कुठून आणि कशी करावी हा प्रश्न समोर होता. आम्हाला सर्वांना सांप्रदायाची आवड होती. मग सर्वप्रथम आम्ही कीर्तनाच्या स्वरुपात जनजागृती करुन २८-११-२०१४ रोजी खऱ्या अर्थाने आयकॉनच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात केली.
नंतर विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप, बचतगट मेळावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत, शैक्षणिक मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, दुष्काळी भागाची पाहणी करून पाणी बचतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली. महिला सबलीकरण, महिलांना २० लाख रु. अपघाती विमा, महिलांवर होणारे अत्याचार व त्याची कायदेशीर माहिती संदर्भात कार्यशाळा, जागतिक महिला दिनी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम व यशस्वी महिलांचा सन्मान करुन प्रोत्साहन, मोठ्या प्रमाणावर पाणी वाचवा ही मोहिम राबविली, ठिकठिकाणी योग शिबीरांचे आयोजन करण्यात आले, आरोग्य शिबीर आयोजित करुन आरोग्याविषयी जनजागृती केली असे अनेक सामाजिक उपक्रम.